US Vice President JD Vance Clarifies America's Neutral Stance on India-Pakistan War Tensions : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. पाकिस्तानने गुरुवारी भारतातील काही शहरांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. अशातच दोन्ही देशातील संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेनेही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास या युद्धात अमेरिका सहभागी होणार नसल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.