TRF : ‘टीआरएफ’विरोधात मोर्चेबांधणी; आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याचे प्रयत्न
Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्याचा सूड घेतल्यानंतर भारताने आता त्या हल्ल्याला जबाबदार असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) संघटनेला संयुक्त राष्ट्रांच्या यादीत दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी भारतीय शिष्टमंडळाने संयुक्त राष्ट्रातील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली.
न्यूयॉर्क : पहलगाम हल्ल्याचा सूड उगविल्यानंतर भारताने आता या हल्ल्याला जबाबदार असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या संघटनेला संयुक्त राष्ट्रांनी ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित करावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.