

India Russia Relation
sakal
नवी दिल्ली : ‘‘अमेरिकेच्या शुल्काचा भारतावर दबाव आहे. मात्र भारत आणि रशियाच्या संबंधांवर कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या दबावाचा परिणाम होणार नाही. तसेच भारत – रशियाच्या तेल व्यापारावर अमेरिकेच्या निर्बंधांचे सावट पडू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे,’’ असे प्रतिपादन रशियाच्या अध्यक्षांच्या कार्यालयाचे(क्रेमलिन) प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी केले.