

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हे केवळ राजकीय किंवा सामरिक भागीदारीपुरते मर्यादित नसून, त्यामागे अनेक दशकांची विश्वासाची आणि परस्पर हिताची परंपरा आहे. दोन्ही देशांमधील ही मैत्री कोणत्याही तात्कालिक फायद्यावर आधारित नसून, बदलत्या जागतिक परिस्थितीतही अनेक आव्हानांना तोंड देत अधिक मजबूत झाली आहे, असे मत भारतातील रशियाचे कॉन्सुल जनरल Mr. Ivan Fetisov यांनी व्यक्त केले. AP Globale Digital ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी भारत-रशिया संबंध, व्यापार, तेल, पर्यटन, तंत्रज्ञान आणि भविष्यातील सहकार्याच्या विविध पैलूंवर भाष्य केले.