
India-Russia Trade Dialogue at UP International Trade Show
ESAKAL
उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामुळे (इंटरनॅशनल ट्रेड शो) रशिया आणि भारताच्या व्यावसायिक संबंधांना नवी दिशा मिळाली आहे. इंडिया एक्स्पो मार्टमध्ये नुकतीच 'रशिया-भारत व्यापार संवाद' या विषयावर एक विशेष बैठक यशस्वीरित्या पार पडली. या संवादामुळे दोन्ही देशांच्या उद्योजकांना एकत्र येऊन भविष्यातील भागीदारीची चर्चा करण्याची संधी मिळाली.