New York News : पाकिस्तान परकी मदतीवर जगणारा; भारताने ‘यूएन’मध्ये सुनावले, शेजारी देश अपयशी असल्याची टीका
Foreign Aid Dependency : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताने पाकिस्तानवर कठोर टीका केली. ‘पाकिस्तान हा परकी मदतीवर जगणारा अपयशी देश आहे,’ असे भारताचे प्रतिनिधी क्षितिज त्यागी यांनी ठणकावले.
न्यूयॉर्क : ‘‘पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून असलेला एक अपयशी देश आहे,’’ असा कठोर शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत (यूएन) पाकिस्तानला सुनावले. ‘यूएन’च्या मानवाधिकार परिषदेची ५८ व्या सत्रातील सातवी बैठक गुरुवारी झाली.