Canada : कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा भारतावर आरोप; सरकारच्या उत्तरामुळे ट्रूडो सरकारची बोलती बंद

रिपोर्टनुसार, कॅनडा गुप्तचर एजन्सी सीएसआयएसने हा आरोप केला आहे. या बातम्या अशावेळेस पुढे आलेल्या आहे जेव्हा खलिस्तानी समर्थक हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरुन दोन्ही देशांमध्ये राजकीय विवाद सुरु आहे.
Canada : कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा भारतावर आरोप; सरकारच्या उत्तरामुळे ट्रूडो सरकारची बोलती बंद

नवी दिल्लीः कॅनाडातील सार्वत्रिक निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप भारताने फेटाळून लावला आहे. नवी दिल्लीतून आटोवावर पलटवार करण्यात आला आहे. भारताने म्हटलं की, तेच आमच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये लक्ष घालत आहेत.

भारताचं प्रत्युत्तर हे शुक्रवारी कॅनडातील मीडियाच्या त्या रिपोर्टनंतर आलं, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानने कॅनडातील २०१९ आणि २०२१ मधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा दावा केला आहे.

रिपोर्टनुसार, कॅनडा गुप्तचर एजन्सी सीएसआयएसने हा आरोप केला आहे. या बातम्या अशावेळेस पुढे आलेल्या आहे जेव्हा खलिस्तानी समर्थक हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरुन दोन्ही देशांमध्ये राजकीय विवाद सुरु आहे.

Canada : कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा भारतावर आरोप; सरकारच्या उत्तरामुळे ट्रूडो सरकारची बोलती बंद
MI Vs DC Playing-11 : सूर्याच्या एंट्रीनंतर पांड्या कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता? स्टार खेळाडूच्या दुखापतीमुळे दिल्लीचीही चिंतेत

मीडिया रिपोर्टनुसार, कॅनडाचा संघीय आयोग २०१९ आणि २०२१ मध्ये भारताने निवडणुकीत हस्तक्षेप केल्याच्या प्रकरणाचा तपास करत आहे. या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की, आम्ही कॅनडीयन आयोगाच्या तपासणीसंदर्भातील रिपोर्ट बघितला आहे. कॅनडातील निवडणुकांमध्ये भारताच्या हस्तक्षेपाचा आरोप तथ्यहीन आहे. असे आरोप आम्ही फेटाळून लावतो.

Canada : कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा भारतावर आरोप; सरकारच्या उत्तरामुळे ट्रूडो सरकारची बोलती बंद
Sangli Lok Sabha 2024: सांगली लोकसभेबाबत काँग्रेस श्रेष्ठींचा श्रद्धा व सबुरीची सल्ला, विश्वजीत कदमांना ठोस आश्वासन नाही

ते पुढे म्हणाले की, इतर देशांच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये भारत हस्तक्षेप करत नाही. वस्तुस्थिती अशीय की, कॅनडाच भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहे. भारताच्या या उत्तरामुळे कॅनडाची बोलती बंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com