India US trade : टॅरिफ लादल्यावरही अमेरिकेकडे ‘या’ वस्तूंच्या खरेदीसाठी भारताशिवाय नाही दुसरा पर्याय!

India-US Trade Relations Current Scenario: अमेरिकेने अन्यायकारक पद्धतीने भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लादला आहे, ज्यामुळे भारतातील कापड ते सीफूड क्षेत्र प्रभावित झाले आहे.
India remains a vital trade partner for the US despite tariffs on key imports.
India remains a vital trade partner for the US despite tariffs on key imports.sakal
Updated on

भारताने अमेरिकेत सध्या टॅरिफ वॉर सुरू आहे. टॅम्प यांच्या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका दोन्ही देशांमध्ये काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेने अन्यायकारक पद्धतीने भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लादला आहे, ज्यामुळे भारतातील कापड ते सीफूड क्षेत्र प्रभावित झाले आहे.

तर काही कंपन्यांनी सुरत, नोएडा आणि तिरुपूर सारख्या ठिकाणी उत्पादन थांबवले आहे. ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या विकासावर ०.३ ते ०.५ टक्के परिणाम होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तसेच, अमेरिकेची ७० टक्क्यांपर्यंत म्हणजेच ५५ अब्ज डॉलर्सची निर्यात कमी होऊ शकते.

अशा परिस्थितीतही अमेरिका भारतातून काही वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करणार आहे, कारण अमेरिकेकडे भारताकडून खरेदी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जर अमेरिका या वस्तू भारताव्यतिरिक्त इतर ठिकाणांहून खरेदी करत असेल तर त्यांना आयातीचा जास्त खर्च करावा लागेल. तसेच, अमेरिकेच्या गरजेनुसार इतर कोणताही देश या वस्तू स्वस्तात पुरवू शकत नाही.

India remains a vital trade partner for the US despite tariffs on key imports.
Modi and Xi Jinping meeting : अखेर मोदी अन् जिनपिंग यांच्या भेटीचा मुहूर्त ठरला! , ट्रम्प ‘टॅरिफ’वरही होणार चर्चा?

कदाचित हेच कारण असेल की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वस्तूंवर टॅरिफ लादला नाही किंवा फक्त २५ टक्केवर बेसिक टॅरिफ ठेवला आहे. या वस्तू अजूनही पूर्वीप्रमाणेच अमेरिकेला निर्यात केल्या जात आहेत.

India remains a vital trade partner for the US despite tariffs on key imports.
India textile export plan: ट्रम्प यांना भारताचं सडेतोड प्रत्युत्तर! आता अमेरिका वगळता ‘या’ ४० देशांशी करणार संपर्क

अमेरिकेने ज्या भारतीय उत्पादनांना टॅरिफमधून सूट दिली आहे, त्यात फार्मा सेक्टर (औषधे आणि उपकरणे), इलेक्ट्रॉनिक्स (स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने), अतिरिक्त ऊर्जा आणि पेट्रोलियम इत्यादी अक्षय उत्पादने यांचा समावेश आहे. तर काही उत्पादनांवर फक्त २५ टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे, ज्यात लोह-शिसे, अॅल्युमिनियम, तांबे आणि त्यांचे उत्पादन इत्यादींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com