पाककडून हल्ल्यासाठी F-16 नव्हे तर JF-17चा वापर

JF-17
JF-17

वाशिंग्टन: भारताच्या हद्दीत घुसण्यासाठी पाकिस्तानने F-16 नव्हे तर JF-17चा वापर केला आहे, अशी माहिती एका अहवालाद्वारे पुढे आल्याचे वृत्त सीएननने दिले असल्याची माहिती पाकिस्तानमधील 'डॉन' या वृत्तपत्राने दिली आहे. JF-17 या लढावू विमानाचे चीन व पाकिस्तानने संयुक्तरीत्या तयार केले आहे, असेही वृत्तामध्ये म्हटले आहे.

अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या "एफ 16एस' हे लढाऊ विमान वापरल्याचे पुरावे भारताच्या हवाई दलाने गुरुवारी (ता. 28) जगापुढे सादर केले होते. अमेरिकेकडून घेतलेले "एफ-16' हे पाकिस्तानी हवाई दलाच्या ताफ्यातील अत्याधुनिक विमान आहे. भारताने "मिग-21 ची खरेदी तत्कालीन सोव्हिएत युनियनकडून केली होती. या दोन्ही विमानांमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या असल्या तरीही, एफ- 16 हे काहीसे वरचढ समजले जाते. पाकिस्तानची एफ-16 विमाने बुधवारी (ता. 27) सकाळी भारतीय हद्दीत घुसली तेव्हा भारताची मिग- 21 विमाने हवाई गस्तीवर होती. ती तातडीने एफ-16 च्या मागावर पाठवण्यात आली. या हवाई संघर्षात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी एक एफ-16 विमान पाडले. वर्धमान यांनी "मिग- 21'मधून रशियन आर- 73 प्रकारचे क्षेपणास्त्र डागून एफ- 16 पाडल्याचे सध्या मानले जात आहे.

रशियाने त्यांच्या ताफ्यातील मिग- 21 विमानांचे 1990 च्या दशकात आधुनिकीकरण केले. त्यानंतर भारतानेही हवाई दलातील साधारण 110 मिग- 21 विमानांचे 2006 च्या दरम्यान आधुनिकीकरण केले. या सुधारित विमानांना "मिग- 21 बायसन' असे नाव दिले आहे. त्यात जुन्या यंत्रणा बदलून अनेक नवीन यंत्रणा बसवल्या आहेत. मिग- 21 बायसनच्या कॉकपिटमध्ये अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा आणि अन्य उपकरणे बसवली आहेत. त्यावर नवे मल्टि-मोड रडार बसवले आहे. सध्याच्या आधुनिक विमानांप्रमाणे त्याच्या वैमानिकाच्या हेल्मेटच्या काचेवर लक्ष्यासंबंधी उपयुक्त माहिती पाहण्याची सोय केली आहे. त्याला "हेल्मेट-माउंटेड डिस्प्ले' म्हणतात. जुन्या मिग- 21 विमानांच्या कॉकपिटची कॅनॉपी किंवा काचेचे आवरण वैमानिकाला चौफेर दृष्टी फिरवण्यात अडचण आणत असे. आता त्याऐवजी सर्वत्र नजर टाकता येईल, अशी रॅप-अराउंड कॅनॉपी बसवली आहे. तसेच मिग- 21 बायसनवर रशियन "आर- 73 आर्चर' आणि "आर- 77 अँडर' ही हवेतून हवेत मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे बसवली आहेत. त्यातील आर- 73 हे लघू पल्ल्याचे म्हणजे 30 कि.मी.पर्यंत मारा करणारे; तर आर- 77 हे मध्यम पल्ल्याचे म्हणजे 100 कि.मी.पर्यंत मारा करू शकते. या क्षेपणास्त्रांचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा अडीच ते तिप्पट म्हणजे ताशी साधारण 3000 कि.मी. इतका आहे. ही क्षेपणास्त्रे बसवल्याने मिग- 21 बायसनला दृष्य मर्यादेच्या पलीकडील (बियॉंड व्हिज्युअल रेंज- बीव्हीआर) लढतीत बळ मिळाले आहे.

अमेरिकेच्या दुतावासाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे, 'पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले F-16 या विमानाचा वापर केला की नाही याबाबतची माहिती आम्ही घेत आहोत.' दरम्यान, भारताच्या हद्दीत घुसण्यासाठी पाकिस्तानने F-16 या विमानाचा वापर केल्याचे पुरावे जगासमोर मांडल्यानंतर पाकिस्तानने F-16 या विमानाचा वापर केलाच नव्हे, असा कांगावा सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com