Indian Air Strike : पाकिस्तानकडून समझोता एक्‍स्प्रेस रद्द

वृत्तसंस्था
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने दोन्ही देशात धावणारी समझोता एक्‍स्प्रेस रद्द केली आहे. वेळापत्रकाप्रमाणे लाहोरहून गुरुवारी (ता. 28) सुटणारी रेल्वे आता रद्द केली आहे. समझोता एक्‍स्प्रेस ही साधारण रेल्वे नसून दोन्ही देशातील संबंध वृद्धिगंत करणारी रेल्वे मानली जाते.

22 जुलै 1976 रोजी अटारी ते लाहोरदरम्यान समझोता एक्‍स्प्रेस सुरू झाली होती. समझोता एक्‍स्प्रेस ही भारतात केवळ अटारी ते वाघा सीमेदरम्यान केवळ तीन किलोमीटरचा प्रवास करते. त्यानंतर पाकिस्तानचा प्रवास सुरू होतो. 1971 च्या युद्धानंतर तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिखार अली भुट्टो यांच्यात सिमला करार झाला होता. त्यानुसार दोन्ही देशात रेल्वेमार्गाने संबंध प्रस्थापित करण्यासाठी समझोता एक्‍स्प्रेस सुरू केली होती. अटारी ते लाहोर मार्ग सुरवातीपासूनच अस्तित्वात होता. त्यामुळे या रेल्वेत कोणतेही अडथळे आले नाहीत. ही रेल्वे लाहोरहून सकाळी 8.30 वाजता सुटते आणि दुपारी 12.30 वाजता अटारी श्‍यामसिंह स्थानकात पोचते. यादरम्यान केवळच एकच स्टॉप वाघा सीमेचा असतो. 27 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी या रेल्वेला चार तास लागतात. या रेल्वेची गती सात किलोमीटर प्रतितास आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Air Strike Pakistan Cancelled Samjhauta Express