कोरोनाच्या संकटात भारतीय-अमेरिकी जोडप्याचं दातृत्व; हेल्थ सेक्टरसाठी एक कोटीची मदत

Indian_American_Couple
Indian_American_Couple

वॉशिंग्टन : भारतीय-अमेरिकन जोडप्याने बिहार आणि झारखंडमधील आरोग्य सेवांबाबतची कामे व्हावीत, यासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. बिहार-झारखंड असोसिएशन ऑफ उत्तर अमेरिका (BJANA) ने सोमवारी (ता.२९) याची घोषणा केली. रमेश आणि कल्पना भाटिया फॅमिली फाऊंडेशन'ने बीजेएएनए ला १ लाख ५० हजार डॉलर प्राण-बीजेएएनए उपक्रमासाठी दिले आहेत. हा निधी बिहार आणि झारखंड या दोन्ही राज्यांच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविण्यासाठी वापरण्यात येणार आहे. 

बिहार आणि झारखंडमधील वंचित आणि दुर्बल घटकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी ही संस्था काम करते. प्रवासी अॅल्युमनी नि:शुल्क (PRAN) हा उपक्रम राबविला जात आहे. डॉक्टरांनी रांची येथे एक प्राण क्लिनिक सुरू केलं असून गरजूंना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. 

बीजेएएनएचे अध्यक्ष अविनाश गुप्ता यांनी रमेश आणि कल्पना भाटिया यांचे आभार मानले आहेत. अशा देणग्यांमुळे बीजेएएनए ला आरोग्य सेवा क्षेत्रात काम करण्यात मदत होईल, असं एफआयएचे माजी अध्यक्ष आलोक कुमार यांनी म्हटलं आहे. भाटिया यांनी पटना येथील एनआयटीमध्ये शिक्षण घेतलं असून ते टेक्सासमध्ये यशस्वीरित्या व्यवसाय चालवत आहेत. 

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com