US : भारतीय-अमेरिकन डॉक्टरानं PM मोदी, CM जगन मोहन रेड्डी, अदानींविरोधात दाखल केला खटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi Gautam Adani US Court

यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टानं या नेत्यांना, तसंच इतर अनेकांना समन्स जारी केले आहेत.

US : भारतीय-अमेरिकन डॉक्टरानं PM मोदी, CM जगन मोहन रेड्डी, अदानींविरोधात दाखल केला खटला

एका भारतीय-अमेरिकन डॉक्टरानं वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि पेगासस स्पायवेअरचा (Pegasus Spyware) वापर यासह इतर अनेक मुद्द्यांवर दावा दाखल केलाय. हा खटला 24 मे रोजी अमेरिकेत दाखल करण्यात आला होता.

डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाच्या यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टानं (US District Court) या नेत्यांना, तसंच इतर अनेकांना समन्स जारी केले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला भारतात समन्स पाठवण्यात आलं होतं. हा खटला रिचमंडस्थित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. लोकेश व्युरू (Dr. Lokesh Vuyurru) यांनी पंतप्रधान मोदी, सीएम रेड्डी आणि गौतम अदानी यांच्याविरोधात दाखल केलाय. या प्रकरणात नाव असलेल्या इतरांमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रोफेसर क्लॉस श्वाब यांचाही समावेश आहे.

हेही वाचा: Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमवर 25 लाख, 'D' कंपनीच्या टोळीवर 20 लाखांचं बक्षीस जाहीर : NIA

कोणत्याही कागदोपत्री पुराव्याशिवाय आंध्र प्रदेशातील भारतीय-अमेरिकन डॉक्टरानं हा आरोप केलाय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार, पेगासस स्पायवेअरचा वापर आणि इतर मुद्द्यांवर खटला दाखल केला आहे. हा दावा या डॉक्टरानं 24 मे रोजी दाखल केला होता, त्यानंतर न्यायालयानं 22 जुलै रोजी समन्स जारी केले होते. 4 ऑगस्टला भारताला आणि 2 ऑगस्टला स्वित्झर्लंडमध्ये श्वाबला बोलावण्यात आलं होतं. डॉ. लोकेश यांनी 19 ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर समन्सचे पुरावे सादर केले आहेत.

हेही वाचा: धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

Web Title: Indian American Doctor Files Lawsuit Against Pm Narendra Modi Andhra Cm Jagan Mohan Reddy Gautam Adani

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..