India China conflict | भारतीय हद्दीत चीन अतिक्रमण वादावर अखेर पडदा; बिपिन रावत म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bipin rawat

India China conflict : भारतीय हद्दीत चीन अतिक्रमण वादावर पडदा!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नवी दिल्ली : भारतीय हद्दीत (Indian Territory) येऊन चीन नवीन गाव वसावत असल्याचा जो वाद सुरू आहे. त्याबाबत 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (CDS) बिपिन रावत (Bipin Rawat) यांनी स्पष्ट वक्तव्य केले आहे. काय म्हणाले रावत?

चीनने मोठे गाव वसविण्याबाबत रावत यांचे वक्तव्य..

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने नुकत्याच दिलेल्या एका अहवालात म्हटले की, एलएसीच्या पूर्वेकडील सेक्टरमध्ये तिबेट स्वायत्त प्रदेश आणि भारताच्या अरुणाचल प्रदेशमधील वादग्रस्त भागात चीनने एक मोठे गाव वसवले आहे. त्यानंतर हा वाद सुरू झाला. त्यावर सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांनी सांगितले. ज्या गावाचा उल्लेख करण्यात येत आहे ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (Line Of Actual Control) बाहेर आहे आणि शेजारच्या देशाच्या हद्दीत मोडतं, असं त्यांनी स्पष्ट केलं. चीनने LAC च्या भारतीय अवधारणेचं उल्लंघन केलेले नाही असे बिपिन रावत यांनी सांगितले.

बेकायदेशीर कब्जा किंवा चीनचा केलेला कोणताही दावा अमान्य

दरम्यान, अमेरिकेच्या अहवालावर अधिकृत प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारताने चीनचा आपल्या जमिनीवर केलेला बेकायदेशीर कब्जा किंवा चीनचा केलेला कोणताही दावा मान्य केलेला नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की, चीनने सीमेवरील अनेक दशकांपूर्वी बेकायदेशीरपणे कब्जा केलेल्या भागात, गेल्या अनेक वर्षांमध्ये बांधकामे केली आहेत. भारताने आपल्या जमिनीवरचा असा बेकायदेशीर कब्जा किंवा चीनचा दाव्याला कधीही मान्यता दिलेली नाही.

loading image
go to top