Twitter-Meta ने कामावरुन काढलेल्या 52 हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना भारतीय CEO देणार नोकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dream 11 ceo harsh jain

Twitter-Meta ने कामावरुन काढलेल्या 52 हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना भारतीय CEO देणार नोकरी

सध्या नोकरी करणाऱ्यांसाठी हलाखीचे दिवस आले आहेत. एकापाठोपाठ एक दिग्गज कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ट्वीटर आणि मेटाच्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्यात आली.

आता ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनसुद्धा कंपनीतील कर्मचारी कपात करण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र या कर्मचाऱ्यांसाठी आता एक भारतीय सीईओ देवदूत म्हणून समोर आलाय.

हेही वाचा: Elon Musk : ब्लू टीकचा 'तो' निर्णय स्थगित; Twitter च्या मालकाचा यु-टर्न

मोठ्या संख्येने कर्मचारी कपातीनंतर आता भारतीय सीईओ हर्ष जैन ट्विटर आणि मेटाच्या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेणार आहे. हर्ष जैन हे अनेक भारतीय टेक लीडर्सपैकी एक आहेत. अमेरिकेत 52 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना ट्वीटर आणि मेटा कंपनीने बाहेरचा रस्ता दाखवलाय.

काही भारतीय कर्मचाऱ्यांना निराश होऊन मायदेशी परतावं लागलं. अशात भारतीय कंपनी ड्रीम-११ चे सीईओ आहेत हर्ष जैन यांनी पुढाकार घेत अशा कर्मचाऱ्यांना काम देण्याचं आश्वासन दिलयं. ड्रीम स्पोर्ट्स डिझाइन, प्रोडक्शन आणि टेक्नोलॉजीचा दांडगा अनुभव असणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध करुन देणार आहे.

हेही वाचा: Meta Lay off: चार महिन्यांचा पगार घ्या, गप घरी बसा; झुकरबर्गलाही लागलं मस्कचं वारं

ड्रीम स्पोर्ट्स ही 150 दशलक्ष युझर्स असलेली 8 अब्ज डॉलरची नफा कमावणारी कंपनी आहोत Dream11 हे एक फँटसी गेम प्लॅटफॉर्म आहे जे युझर्सना क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि बर्‍याच गोष्टींमध्ये फॅटन्सी संघ तयार करण्याची संधी उपलब्ध करुन देते. याशिवाय Dream11 ही भारतातील पहिली गेमिंग कंपनी होती जी युनिकॉर्न कंपनी बनली.

टॅग्स :jobsEmployeesTwitter