esakal | सावध व्हा! कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन' आलाय; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक 
sakal

बोलून बातमी शोधा

सावध व्हा! कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन' आलाय; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक 

ब्रिटेन, ब्राजील, दक्षिण अफ्रीकानंतर कोरोनाचा भारतीय स्ट्रेनही आला आहे. या स्ट्रेननं संक्रमीत झालेल्या एका रुग्णांबाबतची माहिती समोर आली.

सावध व्हा! कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन' आलाय; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

Indian coronavirus variant : गतवर्षी आलेल्या कोरोना महामारीनं जगावा विळख्यात घेतलं आहे. सुरुवातीला आपण कोरोना आल्याचं म्हणत होतो. त्यानंतर कोरोनाचं विविध स्ट्रेन आले. याचाच अर्थ कोरोना आपलं रुप बदलतोय. ब्रिटेन, ब्राजील, दक्षिण अफ्रीकानंतर कोरोनाचा भारतीय स्ट्रेनही आला आहे. या स्ट्रेननं संक्रमीत झालेल्या एका रुग्णांबाबतची माहिती समोर आली. हा रुग्ण अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील आहे. सर्वात धोकादायक बाब म्हणजो, भारतीय कोरोना महामारीचा स्ट्रेन डबल म्यूटेंट आहे. म्हणजेच, कोरोनाचा हा नवीन स्ट्रेननं दोनवेळा आपलं रुप बदलू शकतो. पाहूयात हा नवा स्ट्रेन किती धोकादायक आहे.  

उत्तर कॅलिफोर्नियामधील स्टेनफोर्ड यूनिवर्सिटी (Stanford University) मधील आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या लीसा किम म्हणाल्या की, आमच्या संशोधनाकांना भारतीय स्ट्रेनचा कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. हा स्ट्रेन दोन वेळा आपलं रुप (म्यूटेशन) बदलू शकतो. आतापर्यंत यानं फक्त एकदा आपल्यात बदल केलेला आहे. भारतीय स्ट्रेन आढळलेला रुग्ण सॅन फ्रान्सिस्क राहतो. त्याची तपासणी क्लीनिकल वायरोलॉजी लॅबमध्ये करण्यात आली. अमेरिकात भारतातून आलेल्या पहिला नवीन स्ट्रेनचा कोरोनाबाधित रुग्ण आहे. 

द असोसिएटेड प्रेस (AP) नुसार, भारतीय संशोधकांनी या डबल म्यूटेंट भारतीय कोरोना स्ट्रेनचा शोध महिनाभरापूर्वीच लावला होता.  सप्टेंबरपर्यंत भारतात कोरोनाचे रुग्ण कमी होत होते. पण थंडीमध्ये पुन्हा वाढ झाली.  भारतात कोरोनाची दसरी लाट येत असून ती धोकादायक दिसत आहे. प्रति दिवस एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे.  भारतीय स्ट्रेन इतर स्ट्रेनच्या तुलनेत आधिक धोकादायक आहे. 

सध्या जगभरात सध्या पाच प्रकारचे कोरोनाचे स्ट्रेन आहेत.  पहिला वुहान कोरोना विषाणू स्ट्रेन होय. यापासून जगभरात कोरोना महामारी पसरली आहे. २०२० मध्ये जगाला या विषाणूनं विळखा दिला. त्यानंतर ब्रिटन स्ट्रेन, दक्षिण आफ्रिका स्ट्रेन, ब्राझिल स्ट्रेन आणि यानंतर आता भारतीय स्ट्रेन आला आहे.  आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, डबल म्यूटेंटचा भारतीय कोरोना स्ट्रेन फक्त महाराष्ट्रातच नाही तर अन्य काही राज्यांमध्येही पसरला आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या जितक्या केसेस समोर येत आहेत. त्यातील १५ ते २० टक्के प्रकरणं भारतीय कोरोना स्ट्रेनची आहेत.
 

loading image