Imran Khan Arrested: पाकिस्तानात अनागोंदी! भारतीय सुरक्षा दलं अॅलर्ट; LOCवर वाढवली गस्त

इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलनं करत आहेत.
Imran Khan Arrested
Imran Khan Arrested

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचारांच्या आरोपांखाली पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून ठिकठिकाणी त्यांनी तोडफोड, जाळपोळ सुरु केली आहे. पाकिस्तान लष्कराच्या मुख्यालयावरही त्यांनी हल्ला केला आहे. या सर्व घडामोडींवर भारताचं सैन्य दलं बारकाईनं नजर ठेवून आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरही गस्त वाढवण्यात आली आहे. (Indian defence forces strong vigil being maintained by the forces on LOC due to situation in Pakistan)

एएनआयच्या माहितीनुसार, भारतीय संरक्षण दलांकडून पाकिस्तानातील परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. याचपार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवरील दक्षता आणि गस्त वाढवण्यात आली आहे, संरक्षण दलातील सुत्रांच्या हवाल्यानं त्यांनी ही माहिती दिली.

Imran Khan Arrested
पाक लष्कराचा आंदोलकांवर गोळीबार! सरकारी रेडिओ स्टेशन पेटवलं, परिस्थिती नियंत्रणाबाहेर...

दरम्यान, पाकिस्तानात सुरु झालेल्या हिंसाचारानंतर तिथं जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. इम्रान खान समर्थकांनी थेट लष्करी कार्यलयांवर हल्ला केला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात येत आहे. बलुचिस्तानमधील क्वेटा येथे पाकिस्तानी लष्कराने निदर्शनादरम्यान आंदोलकांवर गोळीबार केला. यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहेत तर काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Imran Khan Arrested
Imran Khan Arrested : इम्रान खान यांच्या अटकेनंतर समर्थकांचा राडा, लष्कराच्या मुख्यालयात जाळपोळ

पाकिस्तानचे लष्कर अधिकारी लेफ्टनंट जनरल आसिफ गफूर हे बलुचिस्तानमधील कॉर्प्स कमांडर आहेत. त्यांच्या निवास्थानी देखील समर्थक घुसले आहेत. यावेळी समर्थकांनी दगडफेक केली. एकूण पाकिस्तानातील परिस्थिती बिघडत चालली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com