बिथरलेल्या पाकिस्तानची नवी खेळी; खोब्रागडेंना नाकारला व्हिसा

pakistan denied jayant khobragade visa
pakistan denied jayant khobragade visa

नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दिवसेंदिवस बिघडताना दिसत आहेत. भारत-चीनमधील वादाचा प्रभाव या दोन्ही देशांमधील संबंधावरही वारंवार दिसून येतोय. याचाच एक भाग म्हणजे पाकिस्तानने भारतीय आधिकारी जयंत खोब्रागडे यांना व्हिसा देण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानच्या या कृतीसाठी चीनची फुस असल्याचे सांगितले जात आहे.

इस्लामाबादमध्ये भारताने  जयंत खोब्रागडे यांची मिशन चीफ म्हणून त्यांची नेमणूक केली होती. पण पाकिस्तानने खोब्रागडे यांना व्हिसा देण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानने व्हिसा देण्यास नकार देणं म्हणजे या नियुक्तीसही नकार दिल्यासारखं आहे. यावर्षी जूनमध्ये खोब्रागडे यांची नेमणूक भारत सरकारने पाकिस्तानात मिशन चीफ म्हणून केली होती. त्याच महिन्यात भारताने पाकिस्तानशी राजनैतिक संबंध कमी करत कर्मचाऱ्यांमध्ये 50 टक्क्याने कमी केली होती. 

पाकिस्तानची ही पाऊले विचार न करताच-
खोब्रागडे यांना व्हिसा न देण्याचा पाकिस्तानचा निर्णय भारताने केलेल्या कर्मचार्‍यांच्या कपातीचा सूड म्हणून पाहिलं जात आहे. त्याचसोबतच काश्मिरच्या मुद्द्यावरुन इन्‍फॉर्मेशन वॉरमध्ये (Information war) फारसं यश मिळालं नाही म्हणूनही पाकिस्तान ही कृती करत आहे. युएनमध्ये चीनच्या मदतीने पाकिस्तानने वारंवार काश्मिरचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. पण यात पाकिस्तान प्रत्येक वेळी अपयशी ठरला आहे. खोब्रागडे यांच्या ज्येष्ठतेबाबत पाकिस्तानला समस्या असल्याचं सांगितलं जात आहे. मिशनचे नेतृत्व करण्याच्या बाबतीत ते एक वरिष्ठ अधिकारी असल्याने पाकिस्तान घाबरत आहे. 'पाकिस्तानला या नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही,' असं भारतानं सांगितलं आहे. खोब्रागडे यांनी यापूर्वी पाकिस्तानात काम केलं आहे. 

सध्या जयंत खोब्रागडे अणुऊर्जा विभागात सहसचिव आहेत. याअगोदर ते किर्गिस्तानमध्ये भारतीय राजदूत राहिले आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी रशिया, स्पेन आणि कझाकस्तानच्या मध्येही जबाबदारी स्वीकारली होती. खोब्रागडे यांनी यापूर्वी पाकिस्तानमध्ये काम केलं आहे. गेल्या वर्षी दोन्ही देशांनी आपापल्या उच्चायुक्तांना बोलावले असल्याने आता त्यांचे काम राजदूत करत आहेत.

युएनमध्ये भारताने पाकिस्तानले सुनावले-
भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्यावरून पाकिस्तान, तुर्कस्तान आणि इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ‘ओआयसी’चा (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन) भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेमध्ये खरमरीत शब्दांत समाचार घेतला आहे. जिनिव्हामधील भारताच्या स्थायी मोहिमेचे प्रथम सचिव पवनकुमार बढे यांनी पाकिस्तान, तुर्कस्तान आणि ‘आयओसी’ला सुनावले. पवनकुमार बढे यांनी मानवाधिकार परिषदेच्या 45 व्या सत्रात बोलताना पाकिस्तान, तुर्कस्तानचे दावे खोडून काढताना पाकिस्तान दहशतवादाचा केंद्रबिंदू असल्याचा प्रहार त्यांनी केला.

(edited by- pramod sarawale)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com