भारताशी पुन्हा द्विपक्षीय चर्चा सुरू करणार - इम्रान खान

वृत्तसंस्था
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झाल्याने क्रिकेटपटू इम्रान खान यांना भारतीय राजदूत अजय बिसारीया यांनी शुभेच्छा दिल्या. तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान हे पुढील आठवड्यात पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची अधिकृत शपथ घेतील. याच निमित्ताने खान व बिसारीया वाढता दहशतवाद, सीमेवरील वाढता तणाव व घुसखोरी यांवर चर्चा झाली.

इस्लामाबाद : पुढील आठवड्यात पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणाऱ्या इम्रान खान यांनी भारताचे पाकिस्तानमधील राजदूत अजय बिसारीया यांची भेट घेऊन भारत-पाकिस्तान संबंधांवर चर्चा केली. काश्मिरसारख्या अति महत्त्वाच्या मुद्यावरही त्यांच्यात चर्चा झाली. 

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झाल्याने क्रिकेटपटू इम्रान खान यांना भारतीय राजदूत अजय बिसारीया यांनी शुभेच्छा दिल्या. तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान हे पुढील आठवड्यात पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची अधिकृत शपथ घेतील. याच निमित्ताने खान व बिसारीया वाढता दहशतवाद, सीमेवरील वाढता तणाव व घुसखोरी यांवर चर्चा झाली.

या भेटीत भारत-पाकिस्तानमधील संबंधावर सर्व विषयांवार द्विपक्षीय चर्चा पुन्हा सुरू झाली. तसेच काश्मिर विषयावरही चर्चा झाली. काश्मिरमधील मानवाधिकाराच्या उल्लंघनावरही खान व बिसारीया यांच्यात चर्चा झाली, असे तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. 

सार्क परिषद पुन्हा लवकरच पाकिस्तानातील इस्लामाबादेत व्हावी अशी अपेक्षाही खान यांनी यावेळी व्यक्त केली. 2016 मध्ये या परिषदेचे आयोजन इस्लामाबेदेत करण्यात आले होते, पण दहशतवादाच्या मुद्यामुळे ती रद्द झाली. 

'खान यांनी भारताच्या राजदूतांना चर्चेसाठी बोलवले. जर दोन देशांच्या अधिकाऱ्य़ांमध्ये चर्चाच झाली नाही तर, अडचणी सोडवता येणार नाहीत. दहशतवादामुळे चर्चा थांबविणे याग्य नाही', असे तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी सांगितले.  

खान यांनी पंतप्रधान होणे हे भारतासाठी आशावादी आहे, तसेच भारत-पाकिस्तान संबंध दृढ होण्यास सकारात्मक आहे, असे भारताचे पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी खान यांना फोनवर म्हणल्याचे बिसारीया यांनी सांगितले. बिसारीया यांनी इम्रान खान यांना भारतीय क्रिकेट संघाच्या स्वाक्षऱ्या असलेली बॅट भेट म्हणून दिली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian envoy meets pakistan prime minister imran khan starts discussion on india pakistan relations