Iran Israel Conflict : तेहरानमधून तातडीने बाहेर पडा; केंद्राचे भारतीय विद्यार्थ्यांना निर्देश
Medical Student : इराण-इस्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तेहरानमधील नागरिकांना बाहेर पडण्यास सांगितले. भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नवी दिल्ली : इराण आणि इस्राईल यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असल्याने भारत सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी करत इराणची राजधानी तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना तेथून बाहेर पडण्यास सांगितले आहे.