esakal | भारतीय सैन्याचा रशियात जोरदार युद्धाभ्यास; पाहा थरारक Video
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army

भारतीय सैन्याचा रशियात जोरदार युद्धाभ्यास; पाहा थरारक Video

sakal_logo
By
सुधीर काकडे

एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे चीन बरोबर सीमेवर सतत होत असलेल्या संघर्षामुळे भारतीय सैन्याला आपली क्षमता वाढवणे आवश्यक झाले आहे. याच पार्श्वभुमीवर भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या काही तुकड्या सध्या रशिमध्ये युद्धाभ्यासासाठी गेल्या आहेत. शांघाय परिषदेचा एक भाग म्हणून भारत या युद्धाभ्यासात सहभागी झाला असून. भारतीय सैन्याच्या तुकड्या रशियात जोरदार सराव करत असल्याचे दिसून आले आहे. सध्या या सरावाचे काही चित्त थरारक दृष्य समोर आले आहेत.

भारतीय लष्कराच्या २०० तुकडया सध्या रशियामध्ये युद्ध सराव करता आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन पिस मिशनमध्ये सहभागी होत भारताच्या भुदल, हवाईदल आणि नौदलाच्या तुकड्या रशियाच्या सैन्यासह युद्धाभ्यास करता आहेत. या सरावात भारतासह पाकिस्तान आणि चीनचे सैन्य देखील सहभागी असल्याचे सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: तालिबानने भारतीय माध्यमांना दिली प्रथमच मुलाखत;पाहा व्हिडिओ

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन पिस मिशनचा दहशतवाद विरोधी युद्धाभ्यास या आठवड्यात सुरु झाला असून, तो २६ सप्टेंबरपर्यंत सुरु आहे. यावर्षी रशियाच्या ओरेनबर्ग शहरात पार पडणाऱ्या या सरावात भारत मागच्या वर्षी देखील सहभागी झाला होता. भारतीय सैन्य सहभागी असलेल्या ZAPAD-21 या सरावात पाकिस्तान आणि चीनच्या तुकड्या निरीक्षक म्हणून सहभागी झाले आहेत.

loading image
go to top