
भारतानं श्रीलंकेत सैन्य पाठवले? भारतीय उच्चायुक्तालयाचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली : सध्या श्रीलंकेत आर्थिक टंचाईवरून हिंसाचार (Sri Lanka Economic Crisis) उफाळला आहे. माजी खासदारांची घरं पेटवण्यात येत आहे. यासाठी भारत आपले सैन्य कोलंबोला पाठवत असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे भारतीय उच्चायुक्तांनी (Indian High Commission) बुधवारी स्पष्ट केले. भारत श्रीलंकेच्या लोकशाही, स्थैर्य आणि आर्थिक पुनरुत्थानाला पूर्णपणे पाठिंबा देत असल्याचं उच्चायुक्तांनी म्हटलं आहे.
हेही वाचा: Crises In Sri Lanka : श्रीलंकेतील भारतीयांसाठी हेल्पलाईन नंबर जारी
सोमवारी राजीनामा दिल्यापासून महिंदा राजपक्षे यांचा ठावठिकाणा नाही. महिंदा यांनी त्यांचे अधिकृत निवासस्थान सोडल्यानंतर ते कुठे गेले कोणालाही माहिती नाही. त्यामुळे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांचे कुटुंबीय भारतात पळून गेल्याच्या अफवा सोशल मीडियावरून पसरविण्यात आल्या होत्या. या बातम्या बनावट आणि खोट्या असल्याचं दोन्ही देशांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर भारतीय उच्चायुक्तांचं हे वक्तव्य आलं आहे. भारताने श्रीलंकेत आपले सैन्य पाठवल्याच्या सोशल मीडियावरील बातम्यांचं आम्ही खंडन करतो. अशा बातम्या भारत सरकारच्या स्थितीशी सुसंगत नाहीत, असं भारतीय मिशनने ट्विटरवर म्हटले आहे. तसेच ''लोकशाही प्रक्रियेद्वारे व्यक्त केलेल्या श्रीलंकेतील लोकांच्या सर्वोत्तम हितासाठी भारत नेहमीच मार्गदर्शन करेल", असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं होतं.
श्रीलंकेत आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक आणीबाणी आली आहे. त्यामुळे महागाई गगनाला भिडली आहे. नागरिक आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरले आहेत. यारम्यान महिंदा यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. देशात कर्फ्यू लावण्यात आला असून राजधानी कोलंबोमधअये सैन्य दल तैनात करण्यात आले आहे. महिंदा यांनी त्रिंकोमालीच्या पूर्वेकडील बंदर जिल्ह्यातील नौदल तळावर आश्रय घेतल्याचं वृत्त असल्यानं आंदोलकांनी तिकडे धाव घेतली होती. अनेक राजकीय नेत्यांची घरं जाळण्यात आली आहेत. तसेच या हिंसाचारात एका खासदाराने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. आतापर्तंय हिंसाचारात किमान ८ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 250 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
Web Title: Indian Mission Denied Reports Sending Troof To Sri Lanka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..