H-1B व्हिसा घोटाळ्याप्रकरणी अमेरिकेतील भारतीय नागरिकाला अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 22 August 2020

अमेरिकी सरकारकडून एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकी सरकारकडून एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या फेडरल फिर्यादीनुसार एका भारतीयाला बनावट व्हिसा आणि फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. H-1B व्हिसाचा वापर करुन अमेरिकेत येणाऱ्या परदेशी नागरिकांना आकर्षित करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. 

गणपतीच्या आरतीला हा धोका अटळ, काळजी घ्या, अन्यथा होऊ शकते दुर्घटना
 

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नागरिक आशीष साहनी (वय 48) याला गुरुवारी अटक करण्यात आली. साहनीने कथितरित्या H-1B व्हिसा प्राप्त करण्यासाठी बनावट कागदपत्रे जमा केली. यासाठी त्याने चार महामंडळाचा वापर केला. साहनी विरोधात सहा आरोप लावण्यात आले आहेत. 

फिर्यादीने आरोप लावला आहे की, साहनीने 2011 ते 2016 दरम्यान जवळजवळ 2 करोड 10 लाख डॉलर जमवले आहेत. साहनी या प्रकरणी दोषी आढलल्यास त्याला कमीतकमी 10 वर्षांचा तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. 

H-1B प्रकरणी  भारतीय नागरिक आशीष साहनी याने फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याने H-1B व्हिसा घेऊन अमेरिकेत येऊ पाहणाऱ्यांचे चुकीची कागदपत्रे चार महामंडळात दाखल केली आहेत. यातून त्यांने मोठा नफा कमावला आहे. अर्जदार अर्जामधील विशिष्ठ अट पूर्ण करत नसताना, तसं दाखवण्यात आले. त्यामुळे अमेरिकेत व्यवसाय किंवा नोकरीसाठी येणाऱ्यांना फायदा करुन देण्यात साहनीचा हातभार होता, असा आरोप करण्यात आला आहे. 

मुंबईत हायअलर्ट! दिल्लीत IS दहशतवाद्याला पकडल्यानंतर पोलिस यंत्रणेला सूचना
 

दरम्यान, अमेरिका दरवर्षी H-1B व्हिसाचा कोटा जाहीर करत असते. त्यानुसार जगभरातील अनेक इच्छुक विदेशी नागरिक अमेरिक येत असताना. H-1B घेऊन अमेरिकेत येणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण भारतीयांचे आहे. यापाठोपाठ चीनचा क्रमांक लागतो. यावर्षी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसावर निर्बंध लादले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian national arrested in H-1B visa fraud in America us