महिन्याभराच्या लेकराला सोडून परदेशात नर्सचं कर्तव्य बजावणारी आई ग्रेटच!

nurses, Indian nurses, Coronavirus,UAE
nurses, Indian nurses, Coronavirus,UAE

दुबई : संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांवरील उपचाराची धूरा भारतीय परिचारिकांनी (नर्स) आपल्या खांद्यावर घेतली आहे. महिन्याच्या सुरुवातीला 88 परिचारिकांची टीम भारतातून यूएईमध्ये दाखल झाली. त्यांनी मंगळवारी कामाला सुरुवात केली. कोरोना विषाणूच्या विरोधात परदेशात सेवा देण्यासाठी गेलेल्या टीममधील सर्व परिचारिका या महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक येथील एस्टर डीएम हेल्थकेअर रुग्णालयात कार्यरत होत्या.  

यूएईमध्ये दाखल झाल्यानंतर जवळपास आठवडाभर विलगिकरण कक्षातील नियमाचे पालन करुन सर्व परिचारिकांनी यूएईतील रुग्णांना सेवा देण्याचे काम हाती घेतले. संबंधित सर्व परिचारिकांचे (नर्स) कोरोनाची चाचणीचे रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात नियुक्ती देण्यात आली.  एस्टर डीएम हेल्थकेअरचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकिय संचालक डॉ. आझाद मूपेन यांनी गल्फ न्यूजशी संवाद साधताना यासंदर्भातील माहिती दिली आहे. भारतातून यूएईमध्ये सेवा देण्यासाठी गेलेल्या बऱ्याचशा परिचारिका या दुबई आरोग्य प्राधिकरणातंर्गत (DHA) असलेल्या रुग्णालयात सेवा प्रदान करणार आहेत. डीएचए अन्य काही रुग्णालयांनाही सहकार्य करत असून गरजेनुसार आवश्यक ठिकाणी या परिचारिका सेवा देतील, असे आझाद मूपेन यांनी म्हटले आहे.  

भारतातून यूएईमध्ये सेवा देण्यासाठी गेलेल्या परिचारिकांना स्वइच्छेने तीन ते सहा महिने याठिकाणी सेवा करण्याची तयारी दर्शवली आहे. या टिममध्ये केरळमधील एश्ले जेसन ही 25 वर्षीय परिचारिका सर्वात तरुण आहे. नुकताच विवाह झाला असताना एश्ले या परिचारिकेने विशेष आरोग्य मिशनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलय. तिने या मिशनशी जोडले जाण्याचे श्रेय आपल्या पतीला दिले आहे. आपल्या जोडीदाराचं कौतुक करताना एश्ले म्हणते की, माझा पती सामाजिक बांधिलकी जपणारा व्यक्ती आहे. केरळमध्ये 'कोरोना की कडी तोडो' या मोहिमेत तो सहभागी होता. कोरोनाविरोधातील मोहिमेत पतीने अनेकदा माझ्या फोटोंचा वापरही केलाय, असेही एश्लेने म्हटले आहे. जगातील सर्व परिचारिकांसाठी सध्याचा काळ हा आव्हानात्मक असल्याचेही एश्लेने म्हटले आहे.  

तिच्याशिवाय कर्नाटकमधील बंगळुरु येथील रुग्णालयात कार्यरत असलेली स्टेफनी न्यूटन ही परिचारिका आपल्या तीन लहान लेकरांना सोडून यूएईतील कोरोनाच्या लढ्यात सहभागी झाली आहे. तिचा सर्वात लहान मुलं अवघ्या एका महिन्यांचे आहे. या बाळाला ती कुटुंबियांच्या हाती सोपवून कर्तव्य बजावण्यास सज्ज झालीय. महाराष्ट्रातील वर्षा कनिटकर यांची कहानीही थक्क करुन सोडणारी अशीच आहे. भारतातून परदेशात जाताना त्यांना आपल्या 9 वर्षांच्या मुलालाही भेटता आले नाही. त्यांचा मुलगा वडिलांसह कर्नाटकमध्ये आहे. लॉकडाउनमुळे ते याठिकाणी अडकून आहेत.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com