
कोरोनाच्या जाळ्यात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर युद्ध पातळीवर काम करताना पाहायला मिळते. दिवसागणिक चिंता वाढवणाऱ्या बातम्या येत असलेल्या अमेरिकेतून एक सकारात्मक आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.
शिकागो: Coronavirus: सध्याच्या घडीला कोरोना विषाणूने जगभराच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजाराने बेजार असलेल्या रुग्णांवर कोरोना विषाणू अगदीच घातक ठरत आहे. वयोवृद्ध आणि लहान मुलांची या परिस्थितीत अंत्यत काळजीपूर्वक देखभाल करण्याची गरज असल्याची खास सूचना जागितिक आरोग्य संघटनेने देखील दिली आहे. कोरोना विषाणूने अमेरिकेला सर्वाधिक प्रभावित केले आहे. जगभरातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत महासत्ता असलेल्या अमेरिकेतील नागरिकांना या विषाणूने बेजार केल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले आणि यात मृत पावलेल्यांचा सर्वाधिक आकडा हा अमेरिकेत आहे.
कोरोनावर औषध तयार; दहा देशांकडून औषधांची मागणी
कोरोनाच्या जाळ्यात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर युद्ध पातळीवर काम करताना पाहायला मिळते. दिवसागणिक चिंता वाढवणाऱ्या बातम्या येत असलेल्या अमेरिकेतून एक सकारात्मक आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे फुफ्फुसावर गंभीर परिणाम झालेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. संबंधित महिलेच्या फुफ्फुसाचे प्रत्यारोपण करण्यात आले असून या शस्त्रक्रिकेयत भारतीय वंशाच्या डॉक्टरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अमेरिकेत Covid-19 महामारीतील ही पहिली यशस्वी शस्त्रक्रिया आहे.
USA Election : राष्ट्रपती पदाच्या निवडणुका रद्द झाल्या तर काय होईल?
उत्तर प्रदेशमधील मेरठ येथ जन्मलेल्या अमेरिकेत कार्यरत असलेल्या डॉक्टरच्या नेतृत्वाखील ही शस्त्रक्रिया पार पडली. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे संबंधित महिलेचे फुफ्फुस खराब झाले होते. अगदी नाजूक परिस्थितीत असलेल्या महिलेवर शस्त्रक्रिया करुन फुफ्फुस प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिकागो स्थित नार्थवेस्टर्न मेडिसिन रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिलेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली त्या महिलेचे वय 20-25 दरम्यान आहे. तिला जिंवत ठेवण्यासाठी फुफ्फुसाचे प्रत्योरोपण केल्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता, अशी माहिती शस्त्रक्रिया करणाऱ्या टिमचे प्रमुख आणि भारतीय वंशाचे डॉक्टर अंकित भारत यांनी दिली.
अंकित भारत पुढे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील आतापर्यंतची ही सर्वात कठिण शस्त्रक्रिया होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी करणे मोठे आव्हान होते, असेही त्यांनी सांगितले आहे. यापूर्वी युरोपातील ऑस्ट्रेलियामध्ये 45 वर्षांच्या महिलेचे फुफ्फुसाचे प्रत्योपण करण्यात आले होते. ही जगातील पहिली प्रत्योरोपणाची शस्त्रक्रिया मानली जाते.