अपहरण केलेल्या चार भारतीय वंशाच्या मुलांना रस्त्यात सोडून हल्लेखोरांचं पलायन I Kidnap Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

South Africa

काही दिवसांपूर्वी पांढरे झगे घालून सात सशस्त्र इसमांनी दोन वाहनांतून या मुलांचं अपहरण केलं होतं.

भारतीय वंशाच्या चार मुलांना रस्त्यात सोडून हल्लेखोरांचं पलायन

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

दक्षिण आफ्रिका : तीन आठवड्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत (South Africa) बंदुकधारींनी शाळेत जाणाऱ्या चार भारतीय वंशाच्या मुलांचं अपहरण केलं होतं. परंतु, अपहरण केलेल्या भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची चार मुलं त्यांच्या पालकांकडे सुखरूप परत आली आहेत. पोलोकवाने (Polokwane) येथे राहणारे व्यापारी नाझिम मोती (Nazim Moti) यांची जिदान (7), जायद (11), अॅलन (13) आणि जिया (15) ही मुलं सुखरूप घरी परतल्याचे पोलिसांनी सांगितलेय.

काही दिवसांपूर्वी पांढरे झगे घालून सात सशस्त्र इसमांनी दोन वाहनांतून या मुलांचं अपहरण केलं होतं. 21 ऑक्टोबर रोजी शाळेच्या वाटेवर त्यांची कार थांबवून हल्लेखोरांनी ही घटना घडवून आणली. मात्र, हे करत असताना या हल्लेखोरांनी चालकाला कोणतीही इजा केली नाही.

हेही वाचा: तालिबान्यांच्या दहशतीनं 3 लाख लोक अफगाणिस्तानातून पळाले इराणला

पोलिस विश नायडू यांनी सांगितलं, की प्रिटोरियाच्या तशवाने येथील रहिवाशांचा पोलिसांना फोन आला आणि त्यांनी चार मुलं घरी परतल्याचे सांगितले. या चारही मुलांना हल्लेखोरांनी जवळच्या रस्त्यावर सोडून तेथून पळ काढला. पालकांच्या ताब्यात देण्यापूर्वी मुलांची प्रथम वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आलंय. हल्लेखोरांनी या मुलांचं अपहरण का केलं, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा: भरपावसात महिला पोलीस निरीक्षकानं बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर उचलून नेलं रुग्णालयात

loading image
go to top