
ऑस्ट्रेलियातील एडलेडच्या रॉयस्टन पार्कमध्ये चकमकीत गंभीर जखमी झालेल्या भारतीय वंशाच्या गौरव कुंदी यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन पोलिसांनी अधिक बळाचा वापर केल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. २९ मे रोजी सकाळी घडलेल्या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या गौरव यांच्यावर उपचार सुरू होते. १३ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची आता अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉइड प्रकरणाशी तुलना केली जातेय.