
न्यूयॉर्क : जगातील सर्वांत श्रीमंत शहर असलेल्या न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या शर्यतीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून भारतीय वंशाचे समाजवादी नेते झोहरान मामदानी यांची निवड झाल्याने ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे धाबे दणाणले आहेत. आता खुद्द अध्यक्ष ट्रम्प हेच या निवडणुकीत उतरल्याचे दिसते. ‘मामदानी यांचा चेहरा भयावह दिसतो,’ अशा शब्दांत त्यांनी मामदानी यांच्यावर टीका केली, तर मामदानी यांनीही ‘आपण ट्रम्प यांच्यासाठी दुःस्वप्न’ असल्याचे म्हटले आहे.