Indian-Origin Wife Attacks Husband with Knife
esakal
घरातील साफसफाईवरून झालेल्या वादातून पत्नीने पतीच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे हा प्रकार घडला आहे. पती पत्नी दोघेही भारतीय वंशाचे नागरिक असून ते अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.