पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Shalini murder case भारतीय वंशाच्या ३८ वर्षीय महिलेची २२ वर्षीय प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर फरार झालेल्या आरोपीने पोलिसांनी घेरताच स्वत:वरही गोळ्या झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना अमेरिकेत घडलीय.
 Shalini murder case

Shalini murder case

Esakal

Updated on

अमेरिकेत कॅलिफोर्निया राज्याची राजधानी सेक्रामेंटो इथं २२ वर्षीय प्रियकराने ३८ वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडलीय. शालिनी ठाकुर असं महिलेचं नाव आहे. तिच्या संरक्षणाचा आदेश कोर्टाने दिला असतानाच आरोपी रोहित गेल्या वर्षभरापासून शालिनीचा पाठलाग करत होती. शालिनीवर गोळ्या झाडल्यानंतर तो फरार झाला. पण पोलिसांनी घेरताच गाडीतच स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com