esakal | अफगाणिस्तानच्या संघर्षात भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दिकी यांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

अफगाणिस्तानच्या संघर्षात भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दिकी यांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या संघर्षात भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दिकी यांचा मृत्यू

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबूल: अफगाणिस्तानात सुरु असलेल्या संघर्षामध्ये (Afghanistan clashes) एका भारतीय फोटो पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. दानिश सिद्दिकी (Danish Siddiqui) असे त्यांचे नाव आहे. कंदहार शहराजवळच्या (kandhar city) स्पिन बोलदाक (spin boldak) जिल्ह्यामध्ये वृत्तांकन करत असताना दानिश सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. अफगाण स्पेशल फोर्सेस संबंधी वृत्तांकन सुरु असताना ही घटना घडली. (Indian photojournalist Danish Siddiqui killed in Afghanistan clashes dmp82)

अफगाणिस्तानात सध्या तालिबान आणि सैन्यामध्ये लढाई सुरु आहे. अफगाणिस्तावर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी तालिबानने ही लढाई सुरु केली आहे. बराचसा भूभाग ताब्यात घेतल्याचाही त्यांचा दावा आहे.

"काल रात्री कंदहारमध्ये आमचा मित्र दानिश सिद्दिकीचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून खूप दु:ख झालं. भारतीय पत्रकार आणि पुल्तिझर पारितोषिक विजेते दानिश सिद्दिकी अफगाण सुरक्षा दलासंबंधी वृत्तांकन करत होते. ते काबूलला जाण्यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वीच मी त्यांना भेटलो होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि रॉयटर्सच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत" असे अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरीद मामुंदझे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: लॉकडाऊन जीवावर बेतला; विरारच्या हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या

वृत्तवाहिनीसाठी बातमीदार म्हणून दानिश सिद्दिकी यांच्या करीयरची सुरुवात झाली होती. त्यानंतर ते फोटोजर्नलिझमकडे वळले. रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय संस्थेसाठी ते फोटोजर्नलिस्ट म्हणून काम करायचे. सप्टेंबर २००८ ते जानेवारी २०१० मध्ये त्यांनी इंडिया टुडे ग्रुपसाठी बातमीदार म्हणून काम केले आहे.

हेही वाचा: तिकीटावरून सापडला खूनी; ३६ तासात वसई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मागच्या काही दिवसांपासून दानिश सिद्दिकी सर्वाधिक तणाव असलेल्या अफगाणिस्तानातील कंदहारमधील स्थितीवर रिपोर्टींग करत होते. काही मिशन्सवर अफगाण स्पेशल फोर्सेससोबत ते होते. त्यांनी टि्वट करुनच ही माहिती दिली होती. रात्रीच्यावेळी अफगाण स्पेशल फोर्सेसवर तालिबानने हल्ला केला, त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला.

loading image