अमेरिकेत भारतीयाची गोळ्या घालून हत्या 

वृत्तसंस्था
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूजर्सी येथे 16 वर्षांच्या मुलाने भारतीय वंशाचे सुनील एडला (वय 61) यांची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. 15) रात्री घडली. एडला हे मूळचे तेलंगणमधील मेदक येथील रहिवासी होते. आईचा 95 वा वाढदिवस व नाताळानिमित्त ते लवकरच भारतात येणार होते. 

सुनील एडला हे अटलांटिक काउंटी येथे 30 वर्षांपासून राहत होते. अटलांटिक शहरातील कंपनीत ते काम करीत होते. रात्रपाळी करण्यासाठी गुरुवारी ते कार्यालयात निघाले होते. रात्री आठच्या दरम्यान घराबाहेर आल्यानंतर संबंधित मुलाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा जागीच मूत्यू झाला. मारेकरी त्यांची मोटार घेऊन पळून गेला होता. एग हार्बर शहरातून आरोपीला शनिवारी (ता. 17) अटक करण्यात आली. तो अल्पवयीन असल्याने त्याचे नाव प्रसिद्ध करण्यात आलेले नाही, अशी माहिती अटलांटिक काउंटीचे सरकारी वकील डी. जी. टाईनर यांनी दिली.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारतीय अभियंता श्रीनिवास कुचिभोतला याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या दुर्घटनेनंतर अमेरिकेत राहणाऱ्या तेलुगू ख्रिस्ती समुदायाने शोक व्यक्त केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian shot in the US