अवैध ताबा मिळवलेले काश्मीर तातडीने सोडा; भारताने पाकला सुनावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UN मध्ये भारताने पाकिस्तानचे टोचले कान

पाकिस्तानकडून सातत्यानं भारतावर वेगवगेळे आरोप केले जातात. संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून पाकिस्तानने केलेल्या आरोपांना आता भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिलंत आहे.

UN मध्ये भारताने पाकिस्तानचे टोचले कान

पाकिस्तानकडून सातत्यानं भारतावर वेगवगेळे आरोप केले जातात. संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून पाकिस्तानने केलेल्या आरोपांना आता भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिलंत आहे. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारलं आहे. संयुक्त राष्ट्रात भारताच्या प्रतिनिधींनी काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी म्हटलं की, पाकिस्तान भारताविरोधात चुकीचा प्रचार करण्यासाठी युएनच्या व्यासपीठाचा वापर करत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने काश्मीर मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानचे कान टोचले. तसच जम्मू आणि काश्मीरमधील सर्व क्षेत्रातून काढता पाय घ्यावा असा इशाराही दिला आहे.

भारताच्या काउन्सिलर डॉक्टर काजल भट यांनी संयुक्त राष्ट्रात उत्तर देताना म्हटलं की, पूर्ण केंद्र शासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर तसंच लडाख हे नेहमीच भारताचा अविभाज्य भाग होते, यामध्ये ते क्षेत्रही आहे जे पाकने अवैधरित्या बळकावले आहे. अवैध ताबा मिळवलेला सर्व भाग पाकिस्तानने रिकामा करावा असंही भट यांनी म्हटलं.

हेही वाचा: संबंधांचे रुपांतर संघर्षात नको; बायडेन आणि जिनपिंग यांचे एकमत

संयुक्त राष्ट्रात भारताने मंगळवारी म्हटलं की, पाकिस्तान पुरस्कृत सीमेपलिकडील दहशतवादाविरोधात निर्धाराने आणि निर्णायक कारवाईची गरज असून ती सुरुच ठेवू. कोणत्याही चर्चेसाठी चांगलं वातावरण तयार करण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे. अशी चर्चा फक्त दहशतवाद, शत्रूत्व, हिंसा यांच्यापासून मुक्त अशा वातावरणातच होऊ शकते.

काजल भट यांनी म्हटलं की, भारत हा पाकिस्तानसह सर्व शेजारी देशांसोबत चांगले संबंध ठेवू इच्छितो. काही मुद्दे प्रलंबित आहेत ते शिमला करार किंवा लाहोर करारानुसार द्विपक्षीय आणि शांततेने सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत असा विश्वासही भट यांनी दिला.

loading image
go to top