Missile Attack : इराणमध्ये इस्राईलच्या हल्ल्याच्या वेळी बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचा थरार अनुभवलेला भारतीय एमबीबीएस विद्यार्थी मीर खलिफ सुखरूप भारतात परतला. ‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत त्याची सुटका करण्यात आली.
नवी दिल्ली : आम्ही क्षेपणास्त्रे पाहिली, बॉम्बचे आवाज ऐकले, आम्ही घाबरलो होतो, अशा शब्दांत इराणमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या मीर खलिफ या भारतीय विद्यार्थ्याने इस्राईलच्या हल्ल्याचा थरार सांगितला.