Indian Tech Sector
Indian Tech Sectorsakal

भारतीय टेक कंपन्यांकडून तब्बल 2 लाखाहून अधिक अमेरिकन लोकांना रोजगार

गेल्या वर्षी भारतीय तंत्रज्ञान उद्योगातून अमेरिकेच्या दोन लाखाहून लोकांना रोजगार मिळालाय.

भारतात बेरोजगारी ही खूप मोठी समस्या आहे. गेल्या कित्येक दशकांपासून देशातील बेरोजगारी संपावी आणि रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असते पण नुकत्याच एका नॅसकॉमच्या नवीन अहवालात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी भारतीय तंत्रज्ञान उद्योगातून (Indian Tech Sector) अमेरिकेच्या दोन लाखाहून लोकांना रोजगार मिळालाय. म्हणजेच भारताने अमेरिकेला तब्बल 103 अब्ज डॉलर उभे करण्यास मदत केली.

 Indian Tech Sector
Mahatma Gandhi Statue: कॅनडात गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना, भारताकडून दुःख व्यक्त, तपास सुरू

नॅसकॉमचे अध्यक्ष देबजानी घोष म्हणाले की भारतीय टेक सेक्टर फॉर्च्युन 500 पैकी 75 टक्क्यांहून अधिक कंपन्यांसोबत काम करते, ज्यातील बहुतांश कंपन्यांचे मुख्यालय यूएसमध्ये आहे आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आलाय.

याशिवाय अमेरिकेत टेक हब राज्यात टॅलेंटचा विस्तार करणे, यात भारतीय टेक कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आणि याच राज्यांनी त्यांच्या रोजगाराच्या दरात मागील दशकात 82 टक्के वाढ केल्याची माहितीही घोष यांनी दिली.

 Indian Tech Sector
Microsoft मधील १८०० कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार, आर्थिक मंदीची भीती

भारतात बेरोजगारीचा आकडा पाच कोटींच्या घरात

देशात कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि बेरोजगारीची समस्या पुन्हा एकदा समोर आली. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) जारी केलेल्या अहवालानुसार भारतात बेरोजगारांची संख्या डिसेंबर २०२१ पर्यंत ५.३ कोटी इतकी समोर आली आहे. उल्लेखनीय म्हणजे यात महिलांचा आकडासुध्दा मोठा आहे.

सीएमआयईच्या अहवालानुसार जे काम शोधत आहे, त्यांची संख्या सर्वाधिक आहे. जवळपास ३.५ कोटी लोक कामाच्या शोधात आहे. यामध्ये ८० लाख महिलांचा समावेश आहे आणि हे चिंताजनक बाब असल्याचे अहवालात म्हटले आहे तर ५.३ कोटी बेरोजगारीच्या आकडेवारीत महिलांचा आकडा १.७ कोटी आहे.

भारताचा बेरोजगारी दर खुप वाढला असून हे भारतासमोर आव्हान असल्याचे सीएमआयईच्या अहवालात म्हटले आहे. भारतात केवळ ३८ टक्के लोकांनाच रोजगार मिळत असल्याने देशात रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे सीएमआयई म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com