
Nepal Violence
sakal
काठमांडू : नेपाळमधील राजकीय अराजकानंतर आणि हिंसक संघर्षानंतर सर्वाधिक फटका बसला तो नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांना. या भारतीयांना परत आणण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न असून, महाराष्ट्रासह विविध राज्य सरकारांनी आपापल्या राज्यातील नागरिकांना परत आणण्यासाठी यंत्रणा राबविली असून, पर्यटकांना माघारी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, नेपाळमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ठिकठिकाणी सुरक्षा दल तैनात केले आहेत.