भारताच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला कराचीत दिवसाढवळ्या घातल्या गोळ्या, मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा होता 'राईट हँड'

भारताचा आणखी एक शत्रू यमसदनी, कराचीत हाफिज सईदच्या आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा.
 hafiz saeed
hafiz saeed esakal

India's Most Wanted Shot Down:पाकिस्तानातील कराचीमध्ये मुफ्ती कैसर फारुख नावाच्या व्यक्तीची काही अज्ञात लोकांनी गोळ्या घालून हत्या केली. ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली तो भारताचा मोस्ट वाँटेड आतंकवादी असल्याचा दावा केला जातोय. तेथील पोलिस अधिकाऱ्यांना दाट संशय आहे की कैसरला लक्ष्य करत मारण्यात आलं आहे.

पाकिस्तानबरोबरच परदेशातील अनेक ठिकाणी मागच्या काही महिन्यांपासून भारताविरुद्ध कट रचणाऱ्या दहशतवाद्यांची हत्या केली जात आहे. ताजी घटना पाकिस्तानच्या कराचीमध्ये घडली आहे. समनाबाद या ठिकाणी एक व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावेळी एक मदरशातील एका विद्यार्थी देखील जखमी झाला आहे.

समाज माध्यमांवर दावा केला जातोय की मारण्यात आलेला व्यक्ती दुसरा तिसरा कोणी भारताचा मोस्ट वाँटेड कैसर फारुख आहे, ज्याला हाफिज सईदचा उजवा हात देखील मानलं जातं. हाफिज सईद मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. या हत्याकांडाचा कथित व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ने दिलेल्या वृ्त्तानुसार, पोलिसांनी सांगितलं की काही बंदूकधाऱ्यांनी ईदी सेंटरच्या जवळ असलेल्या गुलशन-ए-उमर या मदरशाशेजारी ३० वर्षीय कैसर फारुख आणि १० वर्षीय शाकीर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना जखमी केलं, त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. समनाबादच्या स्थानिक पोलिसांनी सांगितले की, जखमींना नजिकच्या अब्बासी शहीद रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. जिथे उपचारादरम्यान फारुखचा मृत्यू झाला. कैसर याला पाठीत गोळी लागली होती, त शाकिरच्या चेहऱ्याला गोळी घासून गेली होती. (Latest Marathi News)

 hafiz saeed
Asian Games 2023: स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळेचं 'सुवर्ण'यश; भारताची पदकाची कमाई सुरुच

सोशल माडियावर व्हिडीओ व्हायरलं होतोय, ज्यात दावा करण्यात येतोय हा व्हिडीओ त्या घटनेचा आहे. या व्हिडीओमध्ये दिसतय की कैसर फारुख सोबत काही लोक चालताना दिसत आहे. तेव्हा अचानक त्यांच्यावर गोळीबार होतो आणि शेजारी उभे असलेले लोक जीव वाचवण्यासाठी पळ काढतात.(Latest Marathi News)

 hafiz saeed
Asian Games: आशियाई खेळात भारतीयांची चमक! तेजींदरपाल सिंह तूरनं गोळाफेकीत जिंकलं सुवर्णपदक

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com