"जवळपास तासभर नेपाळी सैनिकांकडून अंदाधुंद गोळीबार सुरु होता"

India, Nepal, Border Firing
India, Nepal, Border Firing

नवी दिल्ली- भारताच्या हद्दीत असलेला भूखंड आपल्या नकाशात दाखवून नेपाळने भारतासमोर मोठे धाडक करण्याची चूक केली आहे. या मुद्यांवरुन दोन्ही देशातील वातावरण तापले असाताना 12 जून रोजी नेपाळी सैनिकांनी सीमेवर गोळीबार केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला होता, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी नेपाळी सैनिकांकडून जवळपास एक तास अंदाधुंद गोळीबार सुरु होतो, असं स्थानिकांनी सांगितलं आहे. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे स्थानिक रहिवाशी दहशतीत आहेत. 

नेपाळी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीयाचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जवळजवळ एक तासभर नेपाळी सैनिकांचा गोळीबार चालू होता. त्यामुळे सीमेवरील अनेक रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. एका तासात 18 ते 20 बंदुकीचे शॉट्स नेपाळी सैनिकांकडून चालवण्यात आले होते. त्यावेळीच्या प्रसंगाने आम्ही अजूनही धक्यातून सावरु शकलो नाही, असं नितीश कुमार म्हणाले आहेत. नितीश बिहारमधील जानकीनगरचे रहिवाशी आहेत. याच ठिकाणी नेपाळी सैनिकांचा शुक्रवारी(12 जून) उत्पात पाहायला मिळाला होता.  

नेपाळ सुरक्षा दलांनी जानकीनगर सीमा भागात अचानक गोळीबार सुरु केला होता. यात विकेश यादव, उमेश राम आणि उदय ठाकूर यांना गोळ्या लागल्या होत्या. यात विकेश यादव यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. अन्य दोघांवर उपाचर सुरु आहेत.लगान किशोर भारत-नेपाळ सीमेवर त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले असता नेपाळी सैनिकांनी त्यांना आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली. तसेच लगान यांना नेपाळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच सैनिकांनी शिव्या देत बंदूकीच्या साह्याने त्यांना मारहाण केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. जानकीनगरच्या इतर रहिवांशी नेपाळकडून झालेला हल्ला अनपेक्षित आणि दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. 

नेपाळकडून झालेल्या या अनपेक्षित हल्ल्याने आम्हाला धक्काच बसला. पूर्वी काही अडचणी नव्हत्या. मात्र, अचानक नेपाळी पोलिसांना काय झाले माहित नाही. गोळीबार दुर्दैवी होता. सर्व हे अशाच प्रकारे सुरु राहिलं तर आम्ही लोकं कसं जगायचं?, असा सवाल अजित कुमार यांनी केला आहे. काही भारतीय लोक नेपाळमध्ये कामाला जातात, तर काही नेपाळी लोक भारतात कामाला येतात. मात्र, पहिल्यांदाच नेपाळी सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला आहे, असंही ते म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com