इंडोनेशियाने भारतापेक्षा कमी दरात खरेदी केली जास्त राफेल विमाने

Rafale
RafaleTeam esakal
Summary

इंडोनेशियाने ६ राफेल विमाने जास्त खरेदी करूनही त्यांनी भारतापेक्षा कमी पैशात फ्रान्ससोबत यासाठी करार केला आहे.

नवी दिल्ली - राफेल (Rafale) या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारावरून भारतात (India) आतापर्यंत अनेकदा आरोप प्रत्यारोप झाले आहेत. आता भारताप्रमाणेच इंडोनेशियानेसुद्धा (Indonesia) फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदीचा करार केला आहे. मात्र यामध्ये भारतापेक्षा इंडोनेशियाला राफेल कमी किंमतीत मिळणार आहेत. भारताने मोजलेल्या किंमतीपेक्षा कमी पैशात इंडोनेशियाला भारतापेक्षा ६ राफेल जास्त मिळणार आहेत. इंडोनेशियाचा ८.१ अब्ज डॉलरचा करार झाला असून यात ते ४२ राफेल विमाने खरेदी करतील. तर भारताने २०१६ मध्ये ८.७ अब्ज डॉलरमध्ये ३६ विमानांची खरेदी केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narandra Modi) आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी राफेल विमाने खरेदीच्या करारावर सह्या केल्या होत्या. काही महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणाही केली होती की, सरकार ३६ जेट खरेदी करणार आहे. करारानुसार सप्टेंबर २०१८ पासून विमाने भारताला मिळायला हवी होती. त्यांचा खर्च ७.८ बिलियन युरो इतका होता. भारताला याशिवाय स्पेअर पार्ट आणि युरोपीयन कंपनी एमबीडीएने तयार केलेले उल्का क्षेपणास्त्रसुद्धा मिळणार होतं.

Rafale
बायडेन-पुतीन यांचा फोन कॉल; अमेरिकेने म्हटलं, 'युक्रेनवर हल्ला केल्यास...'

करारानुसार फ्रान्सला भारतात विमानाचे काही भाग तयार करण्यासाठी जवळपास ८ बिलियन युरोच्या २० टक्के इतकी गुंतवणूक करावी लागेल. तर ३० टक्के रकमेचा वापर हा एअरोनॉटिक्स आणि संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्याबाबतही सांगण्यात आलं होतं.

दुसरीकडे इंडोनेशियाने दिलेल्या माहितीनुसार, ४२ राफेल विमाने खरेदी करण्याचा त्यांचा प्लॅन आहे. तर ६ विमाने पोहोचली आहेत. उर्वरित ३६ विमानांसह शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण आणि इतर गोष्टींसदर्भात करार केला जाईल असंही इंडोनेशियाकडून सांगण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com