Indonesia Earthquake : तीव्र भूकंपाने शहर हादरलं! १६२ नागरिक दगावले; मृतांचा आकडा वाढण्याची भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indonesia Earthquake
Indonesia : तीव्र भूकंपाने शहर हादरलं! १६२ नागरिक दगावले; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Indonesia Earthquake: तीव्र भूकंपाने शहर हादरलं! १६२ नागरिक दगावले; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

इंडोनेशियातल्या जावा इथं सोमवारी झालेल्या तीव्र भूकंपात १६२ जणांचा मृत्यू झाला. जमिनीवरच्या राडारोड्याखाली अडकलेल्या नागरिकांचा अद्यापही शोध सुरुच आहे. हा भूकंप जवळपास ५. रिश्टर स्केल इतका तीव्र होता. (Indonesia Earthquake News)

या भूकंपाचा केंद्रबिंदू जावाच्या पश्चिम भागातल्या सिआंजूर शहराच्या आसपास होता. हे ठिकाण इंडोनेशियाची राजधानी जकार्तापासून ७५ किलोमीटर अंतरावर आहे. या भागात जवळपास २०-२५ लाखांची लोकवस्ती आहे. या भूकंपामुळे सिआंजूर शहरातल्या अनेक मोठमोठ्या इमारती कोसळल्या. यामध्ये अनेक शाळा, हॉस्पिटल्स यांचाही समावेश आहे.

या भूकंपामध्ये आत्तापर्यंत १६२ मृत्यू झाल्याची माहिती हाती येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या शाळेचे तास संपल्यानंतर ते ज्यादा तासांसाठी थांबले होते. त्यावेळी हा भूकंप झाला आणि शाळेची इमारत कोसळली. पश्मिच जावाचे गव्हर्नर रिदवान कामिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ हजारांहून अधिक जणांच्या घरांचं मोठं नुकसान झालं आहे.

टॅग्स :EarthquakeIndonesia