Indonesia Earthquake : इंडोनेशियातील बालीत भूकंपाचे जोरदार धक्के, रिश्टर स्केलवर ७.० तीव्रतेची नोंद

Earthquake
EarthquakeEsakal

Indonesia Earthquake : इंडोनेशियातील बाली समुद्रात भागात आज म्हणजेच मंगळवारी (२९ ऑगस्ट) ७.० तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजी सेंटर (EMSC) ने माहिती दिली की भूकंपाचा केंद्रबिंदू हा इंडोनेशियाच्या मातरमपासून २०१ किमी उत्तरेस आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ५१८ किमी खाली होता.

मात्र, यूएस जिओलॉजिकल सर्व्हे  (UGS) ने या भूकंपाची तीव्रता ७.१ एवढी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भूकंप भूकंपाचा केंद्रबिंदू इंडोनेशियातील पश्चिम नुसा तेंगारा येथील बंगसाल जवळ ५२५ किमी खोलीवर असल्याचे सांगण्यात आले. दिलासादायक बाब म्हणजे समुद्राच्या तळाशी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवत असल्याने त्सुनामीचा धोका नाही, अमेरिकन त्सुनामी वॉर्निंग सिस्टमने ही माहिती दिली आहे.

Earthquake
Chandrayaan-3: चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हरच्या मार्गात आला खड्डा अन्...; ISRO ने शेअर केले नवीन फोटो

इंडोनेशियाच्या भूवैज्ञानिक एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बाली आणि लोम्बोकच्या किनारी भागात पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. हे धक्के ६.१ आणि ६.५ रिश्टर स्केलचे दोन भूकंप झाले.

इंडोनेशिया हा भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील भाग मानला जातो. एका रिपोर्टनुसार, सन १९०१ ते वर्ष २०१९ पर्यंत १५० च्या जवळ ७ पेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप आले आहेत. तसेच इंडोनेशियामध्ये अनेक सक्रिय ज्वालामुखी आहेत. २००५ मध्ये २८ मार्च रोजी ८.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या विनाशकारी भूकंपाच्या धक्क्यांमुळे १३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. हा जगातील चौथा मोठा भूकंप मानला गेला.

Earthquake
Chandrayaan-3: लँडर विक्रमने लावला पहिला मोठा शोध, जाणून घ्या चंद्राबद्दल खास माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com