esakal | इंडोनेशिया - तुरुंगात भीषण आग; 41 कैद्यांचा मृत्यू, 39 जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

इंडोनेशिया - तुरुंगात भीषण आग; 41 कैद्यांचा मृत्यू, 39 जखमी

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये बुधवारी पहाटे एका तुरुंगात लागलेल्या आगीत ४१ कैद्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

इंडोनेशिया - तुरुंगात भीषण आग; 41 कैद्यांचा मृत्यू, 39 जखमी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जकार्ता - इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये बुधवारी पहाटे एका तुरुंगात लागलेल्या आगीत ४१ कैद्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ३९ जण आगीत जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. न्याय मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, राजधानीच्या बाहेर असलेल्या तांगेरांग तुरुंगाच्या सी ब्लॉकमध्ये आग भडकली. या तुरुंगात अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधीत गुन्हेगारांना ठेवण्यात येतं. आगीचे कारण अधिकारी शोधत आहेत.

तुरुंगात १२२५ कैदी ठेवण्याची क्षमता असून इथे तब्बल २ हजारांहून जास्त कैदी ठेवण्यात आले होते. आग लागली तेव्हा तुरुंगाच्या सी ब्लॉकमध्ये १२२ कैदी होते. मोठ्या संख्येनं पोलिस कर्मचारी आणि सैनिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आणि सर्व कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा: अफगाणिस्तानचा पंतप्रधानच दहशतवादी, मोहंमद अखुंदबद्दलच्या पाच गोष्टी

इंडोनेशियात तुरुंगातून पळून जाण्यासाठी होणारी भांडणे आणि त्यातून आग लावण्याचे प्रकार ही सामान्य बाब आहे. तुरुंगात ही समस्या नेहमची बनली असून आर्थिक संकटाचाही सामना सरकार करत आहे. तसंच मोठ्या संख्येनं अवैध ड्रग्जचा व्यवसाय करणारे गुन्हेगारांना अटक होत आहे.

loading image
go to top