esakal | अफगाणिस्तानचा पंतप्रधानच दहशतवादी, मोहंमद अखुंदबद्दलच्या पाच गोष्टी
sakal

बोलून बातमी शोधा

नवाझ शरीफ-मुल्ला मोहंमद हसन अखुंद

अफगाणिस्तानचा पंतप्रधानच दहशतवादी, मोहंमद अखुंदबद्दलच्या पाच गोष्टी

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबुल: अफगाणिस्तानात अखेर काळजीवाहू सरकारची (afganistan govt) घोषणा करण्यात आली आहे. मागच्या महिन्यात तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर अंतर्गत मतभेदांमुळे सरकार स्थापनेला (govt formation) विलंब होत होता. आता मुल्ला मोहंमद हसन अखुंदची (Mullah Hassan Akhund) पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. त्याच्याकडे सरकारची सूत्रे असणार आहेत.

खरंतर मुल्ला अब्दुल घनी बरादर याचे नाव आघाडीवर होते. पण मुल्ला मोहंमद हसन अखुंदची पंतप्रधानपदी निवड झाली. बरादर उपपंतप्रधान असणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद्यांच्या यादीमध्ये मुल्ला मोहंमद हसन अखुंदच नाव आहे. आयएसआयचे प्रमुख फैझ हमीद यांच्या अफगाण दौऱ्यानंतर अखुंद आणि अन्य नाव निश्चित झाली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: 1 नोव्हेंबरपासून 'या' स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्‌सअ‍ॅप होणार बंद

आतापर्यंत पडद्यामागे असलेला मुल्ला मोहंमद हसन अखुंद पंतप्रधान बनल्यामुळे चर्चेत आला आहे.

१ 'रेहबारी शुरा' या तालिबानच्या परिषदेचा मुल्ला मोहंमद हसन अखुंद मागच्या २० वर्षापासून प्रमुख आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये या परिषदेमध्ये महत्त्वाची भूमिका असते.

२ २००१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानात युद्ध सुरु केले. त्याआधी तिथे तालिबानचे सरकार होते. त्या सरकारमध्ये मुल्ला मोहंमद हसन अखुंद मंत्री होता.

हेही वाचा: ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवादी अफगाणिस्तानचा गृहमंत्री

३ लष्करी नेत्यापेक्षा धार्मिक नेता म्हणून मुल्ला मोहंमद हसन अखुंद जास्त ओळखला जातो.

४ मोहंमद हसन अखुंद तालिबानचं जन्मस्थळ असलेल्या कंदहारमधून येतो. तालिबानच्या संस्थापकांपैकी तो एक आहे.

५ २००१ मध्ये ऐतिहासिक बामियन बुद्धाची मुर्ती पाडायला मोहंमद हसन अखुंदने मंजुरी दिली होती. ते धार्मिक कर्तव्य असल्याचे त्याने म्हटले होते.

loading image
go to top