
इंडोनेशियातील उत्तरी सुलावेसी येथील तालिस बेटाजवळ एक भयानक समुद्री दुर्घटना घडली. केएम बार्सिलोना व्हीए या प्रवासी जहाजाला अचानक आग लागली, ज्यामुळे जहाजावरील 280 हून अधिक प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या भीषण आगीतून वाचण्यासाठी अनेक प्रवाशांनी समुद्रात उड्या मारल्या. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठीचा संघर्ष स्पष्ट दिसतो.