लाईव्ह कॉन्सर्ट सुरु होता अन् आली त्सुनामी (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
रविवार, 23 डिसेंबर 2018

जकार्ता : इंडोनेशियातील जावा आणि सुमात्रा या बेटांमध्ये असणाऱ्या सुंदा स्ट्रीटला काल (शनिवार) रात्री त्सुनामीचा जोरदार तडाखा बसला. त्सुनामीच्या या तडाख्यात आत्तापर्यंत 62 जणांचा मृत्यू झाला असून, 600 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या त्सुनामीमध्ये झालेल्या जीवित आणि वित्तहानीची माहिती अद्याप मिळाली नाही. मात्र, या त्सुनामीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाईव्ह कॉन्सर्ट सुरु होताना ही त्सुनामी आली.

सुंदा द्वीपाच्या परिसरात भूस्खलन झाले त्यानंतर त्सुनामी निर्माण झाली. पँडेगलांग, सेरंग आणि दक्षिण लँपुंग या किनारपट्टीलगतच्या प्रदेशाला मोठा फटका बसला आहे. या त्सुनामीमुळे समुद्रात तब्बल 15 ते 20 मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या होत्या. तसेच परिसरातील अनेक इमारती अक्षरश: जमीनदोस्त झाल्या आहेत. सध्या मदत यंत्रणांकडून या परिसरात बचावकार्य सुरु आहे, अशी माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Indonesia Tsunami Came While Live Concert was Going