Birth Date टाकण्याची Instagram ची सक्ती, काय आहे कारण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Instagram

Birth Date टाकण्याची Instagram ची सक्ती, काय आहे कारण?

इंस्टाग्राम आता त्यांच्या युजर्सला ॲपमध्ये जन्मतारीख टाकण्याची सक्ती करत आहे. जेणेकरून ते कोणत्याही व्यत्ययाशिवाय इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म वापरू शकतील. गेल्या वर्षी, मेटा-मालकीच्या इंस्टाग्राम ॲपने घोषणा केली होती की ते लवकरच प्लॅटफॉर्मवर वय पडताळणी अनिवार्य करेल. यामागे 13 वर्षांखालील मुलांसाठी ॲपचा वापर प्रतिबंधित करणे, हा एकमेव उद्देश होता. (Instagram forces to users for mentioning date of birth to continue using the app)

हेही वाचा: मुलं जन्माला घाला, लाखोंचा बोनस अन् पगारी सुट्ट्या मिळवा; चीनी कंपनीची ऑफर

इंस्टाग्राम ॲप युजर्सला त्यांचा जन्मतारखेची माहिती त्वरित भरण्यास प्रवृत्त करत आहे. जेव्हा युजर्स ॲप उघडतील तेव्हा त्यांना एक नोटीफिकेशन दिसणार. यात तुम्हाला Instagram वापरण्याकरीता तुमची जन्म तारीखची माहिती भरण्यास विचारले जाईल.

विशेष म्हणजे हि जन्मतारीख तुमच्या सार्वजनिक प्रोफाइलचा भाग असणार नाही. याद्वारे केवळ 13 वर्षांखालील युजर्सला प्रतिबंध तर घालता येईल पण सोबतच वयानुसार तुम्हाला जाहिरातीही दिसेल.

हेही वाचा: अण्वस्त्रसदृश्य क्षेपणास्त्र हल्ल्यांचा सराव केला, युद्धादरम्यान रशियाचं मोठं वक्तव्य

इन्स्टाग्राम युजर्ससाठी ही एक अनिवार्य प्रक्रिया आहे आणि त्यांच्याकडे ती टाळण्याचा पर्याय नाही. परंतु काही युजर्सनी बनावट जन्म तारीखचा तपशील दिल्यास Instagram मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआई) सपोर्ट सिस्टम आहे, जी त्याच्या युजर्सचे अचूक वय शोधण्यात मदत करते. त्यामुळे हि प्रक्रिया तुम्ही टाळू शकत नाही.

Web Title: Instagram Forces To Users For Mentioning Date Of Birth To Continue Using The App

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top