
मुलं जन्माला घाला, लाखोंचा बोनस अन् पगारी सुट्ट्या मिळवा; चीनी कंपनीची ऑफर
बिजिंग : चीनमधील एका कंपनीने आपल्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गजब ऑफर दिली आहे. तिसऱ्या बाळाला जन्म देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता कंपनीकडून बोनस दिला जाणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. बोनससोबतच त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना आता पगारी सुट्टीही मिळणार आहे.
चीन हा जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. त्यामुळे चीनने 1980 साली 'हम दो हमारा एक' हा नियम लागू केला होता पण तरीही त्यानंतर लोकसंख्या कमी झालेली आपल्याला पाहायला मिळाली नाही. त्यानंतर 2016 मध्ये चीन सरकारने हा नियम बंद केला होता. दरम्यान चीनच्या शेजारील देशांमध्ये तीन मुलं जन्माला घालण्याची योजना लागू केल्यावर चीननेही आपल्या देशात तिसरं मूल जन्माला घालण्यासाठी लोकांना प्रोत्सोहान देण्यात येत आहे.
हेही वाचा: 'तुम्ही तुमच्या घरात बसून घरच्यांसाठी अल्टिमेटम द्या, आम्हाला सांगू नका'
चीनमधील एका कंपनीने तिसरं मूल जन्माला घालणाऱ्या कर्मचाऱ्याला मोठा बोनस घोषित केला आहे. रिपोर्टनुसार बिजिंगमधील Beijing Dabeinong Technology Group या कंपनीने आपल्या महिला कर्मचाऱ्यांना तब्बल 90000 Yuan रोख रक्कमेची घोषणा केली आहे. भारतीय चलनानुसार ती रक्कम सुमारे 11.50 लाख इतकी असून तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यावर कर्मचाऱ्यांना रोख स्वरुपात ही रक्कम मिळणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे.
हेही वाचा: "चुकीला माफी नाही" पोलिसांशी पंगा घेणाऱ्यांचे सुजवले तोंड; पाहा व्हिडीओ
रोख रक्कमेचा बोनस दिल्यावर महिला कर्मचाऱ्याला एका वर्षाची आणि पुरुष कर्मचाऱ्याला 9 महिन्याची सुट्टीपण देण्यात येणार आहे. त्यामुळे त्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता मुलं जन्माला घालण्याचा फायदा होणार आहे.
दरम्यान पहिलं मूल जन्माला घातल्यावर 30000 yuan म्हणजेच 3.50 लाख रुपये आणि दुसरं मूल जन्माला घातल्यावर 60000 Yuan म्हणजेच 7 लाख रुपयांचा बोनस या कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. त्यामुळे या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होत आहे.
Web Title: Get Bonus After Born New Baby China Company Offer Employee
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..