पाकिस्तानी ISI चा भारतातील रेल्वे ट्रॅक उडविण्याचा कट, गुप्तचर यंत्रणांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Plan to Blow up Indian Railway Track

पाकिस्तानी ISI चा भारतातील रेल्वे ट्रॅक उडविण्याचा कट, गुप्तचर यंत्रणांचा इशारा

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सने (Pakistan ISI) भारतातील पंजाब (Punjab) आणि त्या राज्यांच्या आसपासच्या राज्यांमध्ये रेल्वे ट्रॅक उडविण्याचा मोठा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत भारतीय गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिला आहे.

हेही वाचा: Video Viral: जेवणाच्या पंगतीत प्लेटवरुन शिक्षक-मुख्याध्यापकाची भांडणं

मालवाहू गाड्या एकमेकांना धडकण्यासाठी रेल्वे ट्रॅक उडविण्याच्या कट रचला असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स भारतातील रेल्वे ट्रॅकला उडविण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे देत असल्याचे समोर आले आहे. भारतात असलेल्या पाकिस्तानच्या स्लीपर सेलला देखील दहशतवादी कारवाया करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे दिले जात असल्याचं गुप्तचार संघटनांनी म्हटलं आहे. याबाबत इंडिया टुडेनं वृत्त दिलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या कारवाया सुरूच असतात. काही दिवसांपूर्वी एक दहशतवाद्याने काश्मिरमध्ये एका काश्मिरी पंडिताची हत्या केली होती. त्यानंतर दुसऱ्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. इतकंच नाहीतर पाकिस्तानमधून थेट भारतात प्रवेश करता यावा यासाठी एक सुरंग बनविल्याचे पुढे आले होते. भारतीय लष्कराला ही सुरंग आढळून आली होती. त्यामुळे घातपाताचा कट उधळण्यात लष्कराला यश आलं होतं.

Web Title: Intelligence Alert Pakistan Isi Blow Up Indian Raliway Track Near Punjab

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PakistanIndia
go to top