कोरोनावरील उपचार पद्धतीत इंटरफेरॉन बिटा ठरतेय उपयुक्त

पीटीआय
Tuesday, 21 July 2020

ब्रिटनमधील सायनरजेन या कंपनीने कोरोनावरील उपचार पद्धतीच्या प्रयोगिक चाचण्यांमध्ये यश मिळाल्याचा दावा केला असून यामुळे कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर होण्यापासून रोखली जाऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे. प्रथिनांच्या वापरावर ही उपचार पद्धती अवलंबून आहे.

लंडन - ब्रिटनमधील सायनरजेन या कंपनीने कोरोनावरील उपचार पद्धतीच्या प्रयोगिक चाचण्यांमध्ये यश मिळाल्याचा दावा केला असून यामुळे कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर होण्यापासून रोखली जाऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे. प्रथिनांच्या वापरावर ही उपचार पद्धती अवलंबून आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सायनरजेन’च्या म्हणण्यानुसार, या उपचार पद्धतीत इंटरफेरॉन बिटा या प्रथिनाचा वापर केला जातो. विषाणू संसर्ग होतो त्यावेळी हे प्रथिन शरीरात निर्माण होते. उपचारांदरम्यान हे प्रथिन नेब्युलायझरच्या साह्याने थेट फुफ्फुसांत सोडले जाते. यामुळे प्रतिकारक्षमता वाढून रोगाचा प्रतिकार होईल. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्तांसाठी ही उपचार पद्धती फायदेशीर ठरू शकते, असा दावा या कंपनीचे प्रमुख रिचर्ड मार्सडन यांनी केला आहे. प्रायोगिक चाचण्यांमध्ये या उपचार पद्धतीमुळे अनेक रुग्णांची स्थिती सुधारल्याचे दिसून आल्याचेही ते म्हणाले. 

चाचणीचे निष्कर्ष

  • रुग्णांची स्थिती सुधारली
  • श्‍वास घेण्यातील अडथळा कमी
  • रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी तिपटीने कमी झाला

इंजेक्शनच्या स्वरुपातील हे औषध श्‍वासामार्फत घेऊन फुफ्फुसांची ताकद वाढविते आणि कोरोनापासून लवकरात लवकर मुक्तता देते, असे चाचणीतून दिसून आले आहे. 
- टॉम विल्कीन्सन, संशोधक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interferon beta is useful in the treatment of coronavirus