
जगभरातील हवामान बदलाने कृषी व्यवस्था धोक्यात
वॉशिंग्टन : जगभरातील विविध प्रदेशांत व प्रामुख्याने अन्नधान्य उत्पादक देशांत हवामान बदलाचे परिणाम दिसू लागले आहेत. हे बदल असेच कायम सुरू राहिल्यास येत्या दशकामध्ये जागतिक कृषी व्यवस्थेवर त्याचे खोल परिणाम जाणवतील अशी भीती शास्त्रज्ञांनी एका अभ्यास प्रकल्पाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
हवामानशास्त्रज्ञ जोनास जॅगेरमेयर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हवामान बदलाचे संकेत व जागतिक कृषी व्यवस्थेवर त्याचे होणारे परिणाम या विषयाच्या संदर्भाने अभ्यास प्रकल्प राबवला आहे. या अभ्यासातून हवामान बदलाचे संकेत व त्याचे जागतिक कृषी व्यवस्थेवर होत असलेले व होणारे संभाव्य परिणाम याबाबत निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनीही हे नवे बदल जाणून घेऊन त्यांचा स्वीकार करायला हवा अशी सूचना मांडण्यात आली आहे.
हेही वाचा: पुणे : व्याज फरकाच्या परताव्याची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर
अन्नसुरक्षेला धोका
आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या देशांतील मुख्य अन्नधान्य पिकांचे उत्पादन घटल्याचा मुख्य निष्कर्ष या अभ्यासातून पुढे आला आहे. या देशांमध्ये यापूर्वीपासूनच अन्न सुरक्षा वा संपत्ती यांची परिस्थिती बिकट आहे. अशा नव्या परिणामांमुळे या परिस्थितीत आणखीच भर पडणार आहे. गरीब देशांतील शेतकरी प्रामुख्याने अल्पभूधारक आहेत. त्यांना पुरेसे अन्न मिळवणेही दुरापास्त असते. अशावेळी अन्न सुरक्षा धोक्यात येऊ शकते.
Web Title: International Climate Change Farming Industry
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..