International Friendship Day: मैत्री दिवसाच्या द्या हटके शुभेच्छा, पहा एकापेक्षा एक भारी मेसेज

आंतरराष्ट्रीय मैत्री दिन हा एक उपक्रम आहे जो UNESCO ने भेदभाव दूर व्हावा या भावनेने सुरु केला आहे
International Friendship Day
International Friendship Daysakal team

आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे जगभरातील लोकांमध्ये मैत्री आणि सहकार्याच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 30 जुलै रोजी साजरा केला जातो. भारतात फ्रेंडशिप डे ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.

माणसाच्या आयुष्यात मैत्रीला खुप अभुतपु्र्ण स्थान आहे. 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन हा एक उपक्रम आहे जो UNESCO ने भेदभाव दूर व्हावा या भावनेने सुरु केला आहे

International Friendship Day
Friendship Day 2022 : फ्रेंडशिप डे’ कधी आहे?

तुम्हाला जर या आंतरराष्ट्रीय मैत्री दिवसानिमित्त तुमच्या मित्र मैत्रीणींना हटके शुभेच्छा द्यायच्या असेल तर खालील शुभेच्छा लिस्ट चेक करा.

1. गुलाबाचे फुल उमलू दे जीवनाच्या मार्गात

तुमच्या चेहऱ्यावर हास्य कामय राहू दे

तुमच्या चरणावर येऊ दे आनंदाची लाट,

तुमच्यासाठी हीच प्रार्थना कायम माझ्या हृदयात

आंतरराष्ट्रीय मैत्री दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

2. लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो…

लोक स्वप्न पाहतात, आम्ही वास्तव पाहतो…

लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो....

3. मैत्रीपेक्षा अधिक मौल्यवान कोणतीही संपत्ती नाही,

मैत्रीपेक्षा चांगली कोणतीही प्रतिमा नाही,

मैत्री ही कच्च्या धाग्यासारखी आहे,

पण या धाग्यापेक्षा मजबूत कोणतीही साखळी

या जगात नाही!

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

International Friendship Day
तुमचा जोडीदार तुमचा Best Friend आहे का, कसे ओळखाल?

4. दुनियादारीमध्ये आम्ही थोडे कच्चे आहोत,

पण दोस्तीमध्ये एकदम सच्चे आहोत

आमचे सत्य फक्त यावरच कायम आहे की

आमचे मित्र आमच्यापेक्षाही खूप चांगले आहेत !!!

मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

5. मैत्री हसवणारी असावी

मैत्री चिडवणारी असावी

प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी

एक वेळेस ती भांडणारी असावी

पण कधीच बदलणारी नसावी

मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

6. शब्दांपेक्षा सोबतीत जास्त सामर्थ्य असतं,

मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असतं.

मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!

7. प्रेमाच्या चौकात कितीपण फिरा मित्रांच्या कट्यांवर येणारी मज्जा काही औरच असते.

मैत्री दिवस शुभेच्छा.

International Friendship Day
Friendship Day: 1 ऑगस्ट आणि 30 जुलैच्या फ्रेंडशिप डेमध्ये काय फरक असतो?

8. रक्ताची नसूनही रक्तात भिणते ती मैत्री….

मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!

9. मैत्री म्हणजे थोडं घेणं

मैत्री म्हणजे खूप देणं

मैत्री म्हणजे देता देता

समोरच्याच होऊन जाणं..

मैत्री दिनाच्या शुभेच्छा..

10. मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत,

स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,

पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र,

दैवानेच लाभतात…

मैत्री दिनाच्या शुभेच्छा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com